स्वीकार माईंड केअर सेंटर काय आहे?
स्वीकार माईंड केअर सेंटर हे एक ऑनलाइन मानसिक आरोग्य मार्गदर्शक आणि जीवनशैली विकास केंद्र आहे. आम्ही मानसोपचार, ताणतणाव मुक्ती, मन:शांती आणि सकारात्मक सवयींच्या विकासासाठी स्ट्रक्चरल ऑनलाइन कोर्सेस आणि १-ऑन-१ समुपदेशन सत्रे पुरवतो.
प्रत्येकाला मानसिकदृष्ट्या सक्षम बनवणे
सुलभ, परवडणाऱ्या आणि प्रभावी ऑनलाइन शिक्षण व समुपदेशनाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला दैनंदिन जीवनातील ताणतणावावर मात करण्यास मदत करणे आणि त्यांना सकारात्मक, समृद्ध व आनंदी जीवन जगण्यासाठी सक्षम करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.
आम्ही कसे काम करतो?
मूल्यंकन
तुमच्या गरजा, मानसिक ताणतणाव आणि जीवनशैलीची उद्दिष्टे समजून घेतली जातात.
मार्गदर्शक आराखडा
तुमच्या दैनंदिन वेळापत्रकानुसार सोयीस्कर असा अभ्यासक्रम किंवा मार्गदर्शन दिले जाते.
प्रगती आणि यश
नियमित स्वाध्याय आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने जीवनात सकारात्मक बदल अनुभवता येतात.
आमची तज्ज्ञ व मार्गदर्शक टीम
अनुभवी शिक्षक आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या सोबतीने स्वतःची प्रगती करा आणि आत्मविश्वासाने पुढे जा.
सौ सरिता चौगुले
- महिलांना इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स शिकवणे.
- वेगवेगळ्या वर्कशॉप द्वारे त्यांना भावनिक व मानसिक दृष्ट्या मजबूत करणे.
- एक ज्येष्ठ शिक्षिका या नात्याने माझ्या सर्व विद्यार्थ्यांना एकत्र येऊन शिकण्यासाठी आणि स्वतःची प्रगती करण्यासाठी एक सुरक्षित प्लॅटफॉर्म तयार करणे.
सौ सायली चौगुले
- यूट्यूब व मार्गदर्शन: रोजच्या जीवनातील मानसिक व भावनिक अडचणींवर मात करण्याचे सविस्तर मार्गदर्शन.
- उपक्रम: वैचारिक लेख, समुपदेशन व कार्यशाळांद्वारे जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे कार्य.
- सहसंस्थापिका: स्वीकार माईंडकेअरच्या माध्यमातून प्रत्येकाला मानसिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा ध्यास.
सौ विजया कैलास हिरेमठ
- कार्यक्षेत्र: शिक्षिका (स्पर्धा परीक्षा), समुपदेशक व साहित्यिका.
- उपक्रम: शब्दकळी विजयाचे शब्दगंध पुस्तकालय, संस्थापिका: वाचनप्रेमी व संवादिनी महिला वाचनग्रुप (सांगली).
- ध्येय: मुलांमध्ये वाचन संस्कार रुजवून बालपण समृद्ध करणे व महिलांना वाचन-लेखनातून आनंदी जीवनाकडे नेणे.
आमच्यावर विश्वास का ठेवावा?
अनुभवी मार्गदर्शक
सर्व कोर्सेस आणि सत्रे तज्ज्ञ मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशकांकडून तयार केले जातात.
पूर्ण गोपनीयता
तुमची वैयक्तिक माहिती आणि समुपदेशन संवाद १००% गुप्त व सुरक्षित ठेवले जातात.
सुरक्षित ऑनलाइन पेमेंट
पेमेंट Razorpay द्वारे PCI-DSS एनक्रिप्टेड पद्धतीने सुरक्षितपणे केले जाते.
संस्था व नोंदणीकृत माहिती
इलेक्ट्रॉनिक व्यवहार नियमांनुसार आमच्या संस्थेची अधिकृत माहिती खालीलप्रमाणे आहे:
SWEEKAR MIND CARE CENTER
Akunj Nagar, Plot No. 6, Kupwad Road, Vruddhashram Javal, Sangli, Maharashtra – 416416
ईमेल: sweekarmindcarecenter@gmail.com
फोन: +91 72489 47108